
परभणी, 05 मार्च (हिं.स.) : परभणी तालुक्यातील प्रत्येक मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरांमध्ये नागरिकांच्या महसूल विषयक विविध कामांचा तात्काळ निपटारा केला जाणार आहे.
शिबिरांचे वेळापत्रक :
7 मार्च – परभणी ग्रामीण, मौजे ब्राम्हणगाव
14 मार्च – सिंगणापूर
20 मार्च – पेडगाव
27 मार्च – पिंगळी
10 एप्रिल – दैठणा
17 एप्रिल – झरी
24 एप्रिल – जांब
08 मे – परभणी शहर
15 मे – टाकळी कुंभकर्ण
शिबिरांमध्ये प्रलंबित फेरफार निकाली काढणे, सातबारा व आठ-अ दुरुस्ती व वितरण, लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत प्रमाणपत्रांचे वाटप, डिजिटल सातबारा, ई-मोजणी, ई-फेरफार सेवा, पीएम किसान ऍग्रीस्टॅक संदर्भातील कामकाज व तक्रार निवारण यासह संजय गांधी निराधार योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे व शिधापत्रिकांचे वितरण केले जाणार आहे.
महिला बाल विकास पंचायत समिती, तालुका कृषि अधिकारी विभाग, कृषि विभाग, पशुसंवर्धन विभाग, दुय्यम निबंधक कार्यालय, भुमी अभिलेख विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग यांसह विविध विभागांचे सर्व सुविधा नागरिकांना एकाच ठिकाणी पुरविण्यात येणार आहेत.
तहसिलदार डॉ. संदीप राजापुरे यांनी नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांनी या शिबिरांचा नक्की लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis