
नाशिक, 05 मार्च (हिं.स.)।
- कांद्याला हमीभाव मिळावा म्हणून छावा संघटनेच्या वतीने राज्याचे कृषिमंत्री दत्ता भरणे यांच्या मुंबई येथील घराबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी जर कृषीमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास वेळ नसेल तर राजीनामा द्यावा अशी मागणी छावा संघटनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी केली आहे.
संपूर्ण राज्यामध्ये कांद्याच्या भावाची परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे . कांद्याचे भाव सातत्याने पडण्याच्या पाठीमागे वेगवेगळी कारणे असली तरी त्यामध्ये भर म्हणून युद्धजन्य परिस्थितीमुळे कांद्याला बाहेरच्या देशातील मागणी जवळजवळ थांबली आहे त्याचाही परिणाम झाल्यामुळे कांद्याला आता सरासरी एक रुपया भाव मिळत असल्याचे शेतकरी अतिशय संतापलेला आहे. हे सर्व घडत असताना राज्यात कृषिमंत्री आणि राज्य सरकार कोणतीही भूमिका घेत नसल्यामुळे हा संताप अजूनच वाढू लागला आहे . मागील तीन महिन्यापूर्वी देखील छावा संघटनेच्या वतीने शेतमाल आणि कांद्याच्या प्रश्नावरून मुंबईमध्ये कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या घराबाहेर आंदोलन करण्यासाठी गेले होते त्यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कृषिमंत्री भरणे यांनी बांधावरती जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची आश्वासन दिले होते परंतु त्यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही.
जिल्ह्यामध्ये कांदा द्राक्ष यासह इतर शेतमालांच्या भावांवरती गंभीर परिणाम झाल्यामुळे गुरुवारी सकाळी छावा संघटनेच्या वतीने अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील निवासस्थानाबाहेर जोरदार आंदोलन करण्यात आले यावेळी शेतमालाला भाव मिळालाच पाहिजे या मागण्यांसह विविध मागण्यांच्या घोषणा देण्यात आल्या
शेतकऱ्यांसाठी वेळ नसेल तर राजीनामा द्या - गायकर
राज्यामध्ये शेतकरी अडचणीत आला आहे विशेष करून उत्तर महाराष्ट्रामध्ये द्राक्ष कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे इतर शेतमालाला भाव नाही या सर्वांवरती लक्ष देण्याचे सोडून राज्याचे कृषिमंत्री दत्ता भरणे हे दुसऱ्याच कामांमध्ये व्यस्त आहे राज्य सरकार यावर काहीही बोलायला तयार नाही त्यामुळे कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी राजीनामा द्यावा
करण गायकर, अध्यक्ष छावा संघटना
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV