
नंदुरबार, 05 मार्च, (हिं.स.) खरीप हंगाम 2025-26 मध्ये नाफेडच्या वतीने सुरू असलेल्या तूर खरेदी प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन तूर नोंदणीसाठी आता 24 मार्च, 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी आर. एस. इंगळे यांनी कळविली आहे.
यापूर्वी तूर नोंदणीसाठी 20 फेब्रुवारी 2026 ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, अनेक शेतकरी अद्याप नोंदणीपासून वंचित असल्याने शासनाने ही मुदत वाढवून दिली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी सहकारी संघ लि., नंदुरबार संपर्क क्रमांक 9763286860 व शहादा ता. सहकारी खरेदी-विक्री
संघ लि., शहादा संपर्क क्रमांक 7722014165 या केंद्रांवर ही नोंदणी प्रक्रिया सुरू आहे.
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या मुदतवाढीचा लाभ घेऊन शासकीय हमीभावाने तूर विक्रीसाठी आपली नोंदणी त्वरित पूर्ण करावी असेही आवाहन जिल्हा पणन अधिकारी श्री. इंगळे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर