
सोलापूर, 05 मार्च (हिं.स.)।
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलाना दरमहा मिळणाऱ्या दीड हजार रुपये अनुदान तालुक्यातील अनेक महिलांनी ई-केवायसी करून देखील त्यांच्या बँक खात्यावर जमा झाले नाहीत. या योजनेसाठी आपण पात्र की अपात्र हे देखील समजत नसल्यामुळे शासनाच्या या योजनेबद्दल महिलांमधून संताप जनक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने राज्यातील 18 ते 65 वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणली. त्यासाठी त्या कुटुंबातील महिला व एक वाईट मुलगी याचा एका कार्डावर लाभ देण्याचे निश्चित केले. यासाठी पात्र महिलेच्या खात्यावर दरमहा दीड हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला.
मात्र, या निवडणुकीपूर्वी या खात्यावर महिलांचे दीड हजार रुपये जमा झाले मात्र डिसेंबर महिन्यापूर्वी शासनाने पात्र महिलांसाठी पुन्हा ई केवायसी करण्याची अट घातली त्यातील काय बहुसंख्य महिलांनी केवायसी देखील केली परंतु ही केवायसी करून देखील अद्याप त्या पात्र महिलांना त्यांच्या खात्यावर असणारी रक्कम जमा झालेली नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड