बंजारा समाजाच्या प्रश्नांसाठी शासन पातळीवर ठोस प्रयत्न करु : पालकमंत्री बोर्डीकर
परभणी, 05 मार्च, (हिं.स.) - बंजारा समाजाच्या विविध समस्या सोडविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली. जिंतूर तालुक्यातील कुर्हाडी व पिं
बंजारा समाजाच्या प्रश्नांसाठी शासन पातळीवर ठोस प्रयत्न करु : पालकमंत्री बोर्डीकर


परभणी, 05 मार्च, (हिं.स.) - बंजारा समाजाच्या विविध समस्या सोडविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.

जिंतूर तालुक्यातील कुर्हाडी व पिंपळगाव तांड्यावर कार्यक्रमास जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी उपस्थित राहून समाजबांधवांशी संवाद साधला. पारंपरिक लेंगी गात डफड्याच्या तालावर पाऊली खेळणार्या महिलांमध्ये बंजारा पोशाख परिधान करून सहभागी झाल्याने उपस्थित महिलांचा उत्साह द्विगुणित झाला. बंजारा संस्कृतीतील महत्त्वाचा सण असलेल्या होळीमध्ये त्या दरवर्षी तांड्यावर उपस्थित राहतात, अशी भावना समाजबांधवांनी व्यक्त केली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य रोहित चव्हाण यांच्या पुढाकारातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री बोर्डीकर म्हणाल्या, समाजकारणाला प्राधान्य देत असून तांड्यांच्या विकासासाठी कोणतीही कमी पडू देणार नाही. बंजारा समाजाच्या विविध समस्या सोडविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या सहकार्याने तांडा वस्त्यांवरील विकासकामे गतीने पूर्ण करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. ऊसतोड मजुरांची संख्या दरवर्षी कमी व्हावी यासाठी पर्यायी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा पुढाकार घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande