
नाशिक, 05 मार्च (हिं.स.) इराण व इस्त्राईल यांच्यातील युद्धामुळे मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) बंदरावर शेतमालाचे कंटेनर अडकले आहेत. या प्रकरणी केंद्र व राज्य सरकारने तातडीने लक्ष घालावे, असे विनंतीपत्र नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी दिले आहे.
आखाती प्रदेशातील जवळपास १४ देशांमध्ये सध्या संघर्षाची स्थिती आहे. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, तेथील भारतीयांच्या सुरक्षिततेबाबत त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असल्याचे वाजे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
या युद्धजन्य परिस्थितीचा कृषी निर्यातीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. द्राक्षे, कांदा, डाळिंब, पपई, बेदाणे (मनुका) यांसारख्या कृषी उत्पादनांच्या निर्यातीसाठी नाशिक जिल्हा देशातील महत्त्वाचे केंद्र मानले जातो. मात्र, सध्याच्या तणावामुळे समुद्री मार्गांत अडथळे निर्माण होत असल्याने 'जेएनपीटी' येथे कृषी माल अडकून पडला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV