पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांना ‘कै. सौ. कमलताई जामकर दर्पण पुरस्कार’ जाहीर
परभणी, 05 मार्च (हिं.स.)। आदिवासींच्या उत्थानासाठी उल्लेखनीय कार्य करणार्या पद्मश्री डॉ. स्मिता रवींद्र कोल्हे यांना ‘कै. सौ. कमलताई जामकर दर्पण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. येथील कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयाच्या क
पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांना ‘कै. सौ. कमलताई जामकर दर्पण पुरस्कार’ जाहीर


परभणी, 05 मार्च (हिं.स.)।

आदिवासींच्या उत्थानासाठी उल्लेखनीय कार्य करणार्या पद्मश्री डॉ. स्मिता रवींद्र कोल्हे यांना ‘कै. सौ. कमलताई जामकर दर्पण पुरस्कार’ जाहीर झाला आहे.

येथील कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयाच्या कमलताई जामकर सांस्कृतिक सभागृहात सोमवार 9 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित केलेल्या समारंभात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याहस्ते डॉ. स्मिता कोल्हे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष हेमंतराव जामकर राहणार आहेत. यावेळी आ. डॉ. राहुल पाटील, आमदार राजूभैय्या नवघरे, आमदार राजेश विटेकर, थोर समाजसेवक पद्मश्री डॉ. स्मिता रवींद्र कोल्हे (बैरागड, मेळघाट, जि. अमरावती) तसेच डॉ. ज्ञानेश्वर डी. पवार (प्र-कुलसचिव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या पुरस्कार वितरण सोहळ्यास परभणीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन दर्पण पुरस्कार समितीचे अध्यक्ष हेमंतराव जामकर, उपाध्यक्ष अॅड. बाळासाहेब जामकर, सचिव विजयसिंह जामकर, सहसचिव अनिल मोरे, सल्लागार समितीचे प्रा. किसन चोपडे, प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, माजी प्राचार्य डॉ. वसंत भोसले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामचंद्र भिसे व सर्व सदस्यांनी केले आहे.

दरम्यान, माजी मंत्री स्व. रावसाहेब बापूसाहेब जामकर यांनी आपल्या पत्नी स्व. कमलताई जामकर यांच्या स्मरणार्थ 1997 पासून ‘कै. सौ. कमलताई जामकर दर्पण पुरस्कार’ सुरू केला. महिलांच्या स्वावलंबन व सक्षमीकरणासाठी उत्कृष्ट कार्य करणार्या महिलांचा या पुरस्काराद्वारे गौरव केला जातो. यंदा या पुरस्काराचे 23 वे वर्ष असूनm सन 2025 चा 22 वा पुरस्कार पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांना प्रदान करण्यात येणार आहे. यापूर्वी सिंधुताई सपकाळ, डॉ. राणी बंग, डॉ. मंदा आपटे, अनुराधा कुरील, राहीबाई पोपरे यांच्यासह अनेक मान्यवर महिलांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande