परिवहन विभागातील भ्रष्टाचाराविरोधात जळगावात आमरण उपोषण
जळगाव, 05 मार्च, (हिं.स.) प्रजाशक्ती क्रांती दलाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष गहिनीनाथ वाघ यांनी परिवहन विभागातील कथित भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ दिनांक 3 मार्च पासून जळगाव येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या प्रकर
परिवहन विभागातील भ्रष्टाचाराविरोधात जळगावात आमरण उपोषण


जळगाव, 05 मार्च, (हिं.स.) प्रजाशक्ती क्रांती दलाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष गहिनीनाथ वाघ यांनी परिवहन विभागातील कथित भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ दिनांक 3 मार्च पासून जळगाव येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या प्रकरणात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या नैतिक राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच तत्कालीन परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अध्यक्षपदी झालेली नियुक्ती रद्द करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

वाघ यांनी आरोप केला की, परिवहन विभागातील काही अधिकारी व कर्मचारी बेकायदेशीर वसुलीत सहभागी असून अनेक तक्रारी असूनही त्यांच्यावर प्रभावी कारवाई होत नाही. त्यामुळे दोषींवर तात्काळ फौजदारी व विभागीय कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती नेमावी, परिवहन विभागातील कामकाज अधिक पारदर्शक करण्यासाठी विविध तपासणी प्रक्रियेचे चित्रीकरण करावे आणि मुक्ताईनगर तालुक्यातील करकी येथील सीमा तपासणी नाका कायमस्वरूपी बंद करावा, अशीही मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande