
सोलापूर, 05 मार्च (हिं.स.)।
सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष,उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी बुधवार दि.18 मार्च रोजी दुपारी 2 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद,सोलापूर येथे पहिली बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी,कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे.
राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष पदांपैकी अनुसूचित जाती,अनुसूचित जामाती,नागरिकांचा मागास प्रवर्ग (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह) आणि महिला (अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,नागरिकांचा मागास प्रवर्ग,विमुक्त जाती व भटक्या जमाती यातील महिलासह) यांच्या साठी आरक्षित झालेल्या अध्यक्ष पदांचे वाटप ग्रामविकास विभागाच्या शासन राजपत्र अधिसूचना 9 सप्टेंबर 2025 अन्वये सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग या करीता आहे. 18 मार्चपासून सुरु होणाऱ्या अडीच वर्षाच्या कालावधीकरीता जिल्हा परिषद सदस्यांमधून सोलापूर जिल्ह्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष पद व उपाध्यक्ष पदाचे निवडणूकीसाठी बैठक घेण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड