
परभणी, 05 मार्च, (हिं.स.)। गंगाखेड तालुक्यातील खळी शिवारातील गोदावरी नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपसाविरोधात महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात कॉम्रेड ओंकार पवार, वामन ढोबळे, विजय सोनर आणि माऊली करवर यांनी गोदावरी नदीपात्रात उतरून जलसमाधी आंदोलन केले. अवैध वाळू उपसा तात्काळ थांबवावा आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. दरम्यान, गंगाखेड तालुका प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या वतीने घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. तसेच अवैध वाळू उपसा करणार्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले. या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलनास तात्पुरती स्थगिती दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis