
रत्नागिरी, 5 मार्च, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कक्ष, जिल्हा परिषद व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक श्रवण दिन 6 मार्च रोजी साजरा करण्यात येणार आहे.
शुक्रवारी सकाळी 10 वाजता रोजी स्व. शामरावजी पेजे सांस्कृतिक भवन, जिल्हा परिषद येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात कर्णबधिर दिव्यांग मुले व व्यक्तींसाठी सरकारी धोरणे, योजना याबाबत मार्गदर्शन तसेच यशोगाथा सादर करण्यात येणार आहेत. संबंधितांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र प्रकल्प संचालक सुरेखा पाथरे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी