मोहोळ सभापती व उपसभापती निवडीसाठी राजकीय हालचालींना वेग
सोलापूर, 05 मार्च (हिं.स.)। मोहोळ तालुका पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून, सभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. येथील सभापती पद इतर मागास वर्गासाठी आरक्षित आहे. यावेळी ही
मोहोळ सभापती व उपसभापती निवडीसाठी राजकीय हालचालींना वेग


सोलापूर, 05 मार्च (हिं.स.)।

मोहोळ तालुका पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून, सभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. येथील सभापती पद इतर मागास वर्गासाठी आरक्षित आहे. यावेळी ही पंचायत समितीवर माजी आमदार राजन पाटील यांचेच वर्चस्व राहिले आहे.

तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका नुकत्याच संपन्न झाल्या. पंचायत समितीच्या बारा जागापैकी सात जागावर भाजपाने, तीन जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने, एका जागेवर शिंदे सेनेने, तर एका जागेवर शरदचंद्र पवार पक्षाने विजय मिळवला. पंचायत समिती म्हणजे गावो गावच्या ग्रामपंचायतीशी संलग्न अशी स्थानीक स्वराज्य संस्था आहे.

अनेक विकासाच्या योजना पंचायत समितीच्या माध्यमातून राबविल्या जातात तर पंचायत समितीला शासन स्तरावरुन मोठ्या प्रमाणात विकास निधी येतो. त्यासाठी पंचायत समिती आपल्या ताब्यात असावी यासाठी राजकीय डावपेच सुरू असतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande