कांद्याला प्रतिक्विंटल ५०० ते १००० अनुदानाची मागणी
सोलापूर, 05 मार्च (हिं.स.)। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत २३ जानेवारीपासून कांद्याचे भाव गडगडले. कांदा प्रतिकिलो सहा ते आठ रुपये विकला जात आहे. मोजक्याच कांद्याला १५, १८ ते २० रुपये भाव मिळतोय. मागील ४० दिवसांत सोलापूर बाजार समितीत तब्बल १४ हज
kanda


सोलापूर, 05 मार्च (हिं.स.)।

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत २३ जानेवारीपासून कांद्याचे भाव गडगडले. कांदा प्रतिकिलो सहा ते आठ रुपये विकला जात आहे. मोजक्याच कांद्याला १५, १८ ते २० रुपये भाव मिळतोय. मागील ४० दिवसांत सोलापूर बाजार समितीत तब्बल १४ हजार ९२८ ट्रक (१५ लाख क्विंटल) कांदा विकला गेला. त्यातून शेतकऱ्यांना अवघे ११८ कोटी रुपयेच मिळाले आहेत. ऑक्टोबरपासूनच भाव कमी राहिला आहे.

पुणे, बीड, अहिल्यानगर, धाराशिव, सोलापूर (माढा, मोहोळ, करमाळा, बार्शी या तालुक्यातून सर्वाधिक) या जिल्ह्यातून सोलापूर बाजार समितीत कांदा विक्रीसाठी येत आहे. दरम्यान, यंदाच्या कांदा हंगामात ऑक्टोबर २०२५ मध्ये ९५० ते एक हजार रुपयांचा दर राहिला. नोव्हेंबर महिन्यात ८०० ते १२०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. त्यानंतर डिसेंबरमध्ये ८५० रुपये ते १७०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. नववर्षात भाव वाढेल अशी बळिराजाला आशा होती, मात्र अपेक्षित भाव मिळालाच नाही. जानेवारीमध्ये पण ८०० ते २४०० रुपयांपर्यंतच भाव मिळाला. फेब्रुवारीत तर ७०० ते ९०० रुपये दराने कांदा विकावा लागला.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande