सोलापूर - युद्धजन्य परिस्थितीचा केळी उत्पादक शेतक-यांना फटका
सोलापूर, 05 मार्च (हिं.स.)। इराण-अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीचा फटका सोलापूर जिल्ह्यातील शेतीला बसला असून यामुळे केळी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. या संकटातून मार्ग काढण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने तातडीने हस
सोलापूर - युद्धजन्य परिस्थितीचा केळी उत्पादक शेतक-यांना फटका


सोलापूर, 05 मार्च (हिं.स.)। इराण-अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीचा फटका सोलापूर जिल्ह्यातील शेतीला बसला असून यामुळे केळी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. या संकटातून मार्ग काढण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करून पर्यायी बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी कृषीनिष्ठ परिवाराचे नितीन कापसे यांनी केली आहे.

मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे सागरी वाहतूक विस्कळीत झाली असून, सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा आणि पंढरपूर तालुक्यातील सुमारे 1,200 कंटेनर केळी सध्या कोल्ड स्टोअरेजमध्ये पडून आहेत. केवळ करमाळा, माढा , पंढरपूर तालुक्यातील शीतगृहांमध्ये 30ते 40 कोटी रुपयांचा माल अडकून पडल्याचा अंदाज आहे निर्यात थांबल्याने केळीच्या किंमतीतही 33 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.

फळशेती मधील शेतकऱ्यांनी रमजानच्या महिन्यात आपली फळे बाजारात उपलब्ध व्हावीत याचे नियोजन करून की जेणेकरून चार पैसे जास्त मिळतील. या अपेक्षेने ही फळपिके घेतली आहेत आणि नेमके याच काळात ही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला असल्याचे कापसे यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande