लोहा शहरात 9 मार्चपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
नांदेड, 07 मार्च (हिं.स.)। लोहा शहरातील जुना लोहा येथील हनुमान मंदिरांच्या प्रांगणात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन दि. ९ ते १६ मार्च दरम्यान भरगच्च विविध कार्यक्रमांनी आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमांची दैनंदिनी पुढ
लोहा शहरात 9 मार्चपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन


नांदेड, 07 मार्च (हिं.स.)।

लोहा शहरातील जुना लोहा

येथील हनुमान मंदिरांच्या प्रांगणात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन दि. ९ ते १६ मार्च दरम्यान भरगच्च विविध कार्यक्रमांनी आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमांची दैनंदिनी पुढीलप्रमाणे पहाटे ४ ते ६ काकड आरती ,८ ते ९ ज्ञानेश्वरी प्रवचन, सकाळी १० ते १२ गाथा भजन, ४ ते ५ ज्ञानेश्वरी प्रवचन ,६ ते ७ हरिपाठ धुपारती, रात्री ९ ते ११ हरिकिर्तन

दि. ९-३-२०२६ रोजी हभप श्री केशव

महाराज पालमकर यांचे श्री एकनाथ षष्टी निमित्त गुलालाचे किर्तन सकाळी १० ते १२ वाजे दरम्यान होईल. त्यानंतर रात्री ८.३० ते १०.३० वाजता हभप श्री लक्ष्मीकांत महाराज लोव्हेकर यांच्या हरि किर्तनाने होणार आहे.

तसेच दि. १० रोजी हभप मधुकर महाराज सायळकर यांचे हरि किर्तन, दि. ११ रोजी हभप किशोर महाराज आरजखेडकर यांचे किर्तन, दि.१२ रोजी हभप संदिपान महाराज हसेगावकर यांचे किर्तन, दि.१३ रोजी हभफ ज्ञानेश्वर महाराज आळंदी देवाची यांचे किर्तन, दि.१४ रोजी हभप चंद्रकांत महाराज लाठकर यांचे किर्तन, दि.१५ रोजी हभप हणमंतराव भालेराव गुरुजी यांचे किर्तन, दि.१६ रोजी हभप आत्माराम महाराज रायवाडीकर यांचे सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत काल्याचे किर्तन व नंतर गावकरी मंडळींच्या वतीने महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तेव्हा सदरील कार्यक्रमांचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande