भोकर : महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन
नांदेड, 07 मार्च (हिं.स.)।महसूल विभागाच्या वतीने ग्रामीण भागातील जनता, शेतकरी, महिला, विद्यार्थी यांच्या तक्रारीचा जागीच निपटारा करण्यासाठी तालुक्यात शनिवारी ता. (सात) पासून सलग तीन महिने मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अ
भोकर : महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन


नांदेड, 07 मार्च (हिं.स.)।महसूल विभागाच्या वतीने ग्रामीण भागातील जनता, शेतकरी, महिला, विद्यार्थी यांच्या तक्रारीचा जागीच निपटारा करण्यासाठी तालुक्यात शनिवारी ता. (सात) पासून सलग तीन महिने मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान आयोजित करण्यात आले. त्याचा प्रारंभ झाला. योग्य अंमलबजावणी करण्यासाठी महसूल मंत्र्यांची करडी नजर राहणार आहे अशी माहिती तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी दिली आहे.

मागील कालावधीत महसूल विभागाशी संबंधित सेवा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभावी निर्णय घेण्यात आले.शनिवारी (ता. १४) मार्च, शुक्रवारी (ता. १०) एप्रिल, शुकवारी (ता. १७) एप्रिल रोजी मंडळ स्तरावर शिबीराचे आयोजन करण्यात आले तर शूकवारी (ता. आठ) मे ते शूकवारी (ता.१५) मे दरम्यान नगरपरिषद स्तरावर शिबीराचे आयोजन केले आहे.

तालुक्यात अभियान यशस्वी करण्यासाठी महसूल विभाग सज्ज असून मंडळ निहाय कार्यक्रम आखण्यात आला आहे. अभियान केवळ कागदावरच न राहता योग्य अंमलबजावणी झाली पाहिजे अशा सुचना आहेत. यात दिरंगाई होऊ नये म्हणून स्वताह महसूल मंत्री करडी नजर ठेवून आहेत.

प्रामुख्याने ई-मोजणी, अँग्रीस्टॅक, पीएमओ किसान, तक्रार निवारण, प्रमाणपत्र दाखले, जमिन अभिलेखे अद्यावत करणे, सरकारी योजनांचा लाभजागीच पारदर्शीपणे निपटारा करण्यात येईल. नागरीकाच्या दारी पोहचवून प्रशासन अधिक गतिमान करण्यासाठी तालुक्यातील मंडळ निहाय कार्यक्रम घेण्यात येणार आहे. शनीवारी ता. (सात) किनी, शनिवारी (ता. १४) भोसी, शुक्रवारी (ता. १०) एप्रिल मोघाळी, शुक्रवारी (ता. १७) एप्रिल मातुळ, शुक्रवारी (ता. आठ) मे भोकर शहरात अभियान राबविण्यात येणार आहे. तालुक्यातील जनतेनी सदरील अभियानात सहभागी होवून अभियान यशस्वी करावे

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande