इको फ्रेंडली क्लबचा 12 व्या वर्षीही इको फ्रेंडली रंगांचा जागर!
सोलापूर, 07 मार्च (हिं.स.)। रंगपंचमी म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते पाण्याचे फवारे आणि रासायनिक रंगांची उधळण. पण, याच सणाला पर्यावरणपूरक वळण देण्यासाठी आणि मानवी आरोग्याला इजा पोहोचवणाऱ्या रंगांना फाटा देण्यासाठी सोलापुरात 12 वर्षांपूर्वी एक रोपटे
इको फ्रेंडली क्लबचा 12 व्या वर्षीही इको फ्रेंडली रंगांचा जागर!


सोलापूर, 07 मार्च (हिं.स.)।

रंगपंचमी म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते पाण्याचे फवारे आणि रासायनिक रंगांची उधळण. पण, याच सणाला पर्यावरणपूरक वळण देण्यासाठी आणि मानवी आरोग्याला इजा पोहोचवणाऱ्या रंगांना फाटा देण्यासाठी सोलापुरात 12 वर्षांपूर्वी एक रोपटे लावले गेले, त्याचे नाव 'इको फ्रेंडली क्लब'. यंदा या क्लबच्या सामाजिक कार्याला 12 वर्षे पूर्ण होत असून, आपल्या पर्यावरणपूरक सेवेची 'तपपूर्ती' हा क्लब यंदाही 'नैसर्गिक रंगांच्या' स्टॉलद्वारे साजरी करत आहे.इको फ्रेंडली सण साजरा करा असे केवळ आवाहन करून बदल घडत नाही, तर त्यासाठी पर्याय उपलब्ध करून देणे आणि कृती करणे गरजेचे आहे, या विचारातून इको फ्रेंडली क्लबची स्थापना झाली. गेल्या 12 वर्षांपासून सोलापूरकरांना इको फ्रेंडली क्लबतर्फे पर्यावरणपूरक रंग उपलब्ध करून दिले जात आहेत. रासायनिक रंग आणि पाण्याचा अतिवापर टाळून 'कोरडी रंगपंचमी' साजरी व्हावी, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. रंगपंचमीसह पर्यावरणपूरक गणेशोत्सव, पर्यावरणपूरक दिवाळी आणि इतरही सण-उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे व्हावे यासाठी इको फ्रेंडली क्लब प्रयत्नशील आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande