कंधार तालुक्यातील फुलवळ येथे १० एप्रिल रोजी महसूल शिबिराचे आयोजन
नांदेड, 07 मार्च (हिं.स.)। कंधार तालुक्यातील फुलवळ येथे ''छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान'' अंतर्गत टप्पा क्रमांक १ ची आढावा बैठक पार पडली. त्यानुसार महसूल व इतर विभागांतील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी १० एप्रिल रोजी विशे
कंधार तालुक्यातील फुलवळ येथे १० एप्रिल रोजी महसूल शिबिराचे आयोजन


नांदेड, 07 मार्च (हिं.स.)।

कंधार तालुक्यातील फुलवळ येथे 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान' अंतर्गत टप्पा क्रमांक १ ची आढावा बैठक पार पडली. त्यानुसार महसूल व इतर विभागांतील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी १० एप्रिल रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन महसूल मंडळ अधिकारी एस. आर. शेख यांनी केले आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, उपविभागीय अधिकारी विलास नरवटे आणि तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयाच्या वतीने हे अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमाद्वारे पारदर्शक आणि लोकाभिमुख महसूल प्रशासनाची अंमलबजावणी करत विविध विभागांतील प्रलंबित प्रकरणे शंभर टक्के निकाली काढण्यावर भर दिला जाणार आहे.

फुलवळ महसूल मंडळांतर्गत फुलवळ, अंबुलगा, बोरी (बु.), शेकापूर, घोडज आणि बहाद्दरपुरा असे सहा तलाठी सज्जे असून या सज्ज्यांअंतर्गत सुमारे २० गावे येतात.

या शिबिरात फेरफार अदालत, फेरफार प्रकरणे निकाली काढणे, ७/१२ दुरुस्ती, डिजिटल ७/१२ वाटप.

तसेच लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत उत्पन्न, रहिवासी, जात व नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रांचे वितरण केले जाणार आहे.

यासोबतच संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आदींसाठी अर्ज स्वीकारले जाणार असून एक खिडकी योजनेअंतर्गत अर्जाची पडताळणी करून तात्काळ सेवा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

त्यामुळे मंडळातील गावांतील नागरिक व शेतकऱ्यांनी १० एप्रिल रोजी फुलवळ येथील महादेव मंदिर परिसरात आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande