कसबा गणपती मंडळाचा हा गौरव माझ्यासाठी अत्यंत आनंददायी आहे – महापौर
सोलापूर, 07 मार्च (हिं.स.)। बाळीवेस येथील श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळा तर्फे नूतन सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर सोलापूर महानगरपालिका स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते नगरसेविका बबिताताई धुम्मा व स्विकृत नगरसेवक रुद्
grdf


सोलापूर, 07 मार्च (हिं.स.)। बाळीवेस येथील श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळा तर्फे नूतन सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर सोलापूर महानगरपालिका स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते नगरसेविका बबिताताई धुम्मा व स्विकृत नगरसेवक रुद्रेश बोरामणी या सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते श्रीमंत मानाचा कसबा गणपती पुजा, आरती करून या सर्व मान्यवरांचा सत्कार कसबा गणपती मंडळाचे उत्सव अध्यक्ष बाळासाहेब मुस्तारे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ, शाल, हार आणि कसबा गणपतीची प्रतिमा देऊन गौरविण्यात आले.

या प्रसंगी मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ भोगडे, मल्लिनाथ खुने, संजय दर्गोपाटील, केदार मेंगाणे, मल्लिनाथ मसरे, गुरुलिंग समाणे, रामचंद्र जोशी, बिप्पीन धुम्मा, बाळासाहेब भोगडे, विकास धुम्मा, सोमनाथ मेंगाणे, चिदानंद मुस्तारे, नागनाथ मेंगाणे, पुष्कराज मेत्री, गुरुशांत मोकाशी, आनंद मुस्तारे, जगदीश हिरेहब्बू, लक्ष्मण भाईकट्टी, गुरु पटणे, संजय बिराजदार, राजू उटगे तसेच महिलामध्ये विध्याताई जोडभावी, विजयालक्ष्मी मुस्तारे, रुपाली कुताटे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

सोलापूर हे केवळ एक शहर नसून संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकतेचे प्रतीक आहे. या शहराच्या विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी मला महापौर म्हणून काम करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे.कसबा गणपती मंडळ हे केवळ धार्मिक कार्यात मर्यादित न राहता सामाजिक उपक्रम, आरोग्य शिबिरे, शैक्षणिक मदत आणि आपत्तीच्या काळात मदतीचा हात पुढे करणारे एक आदर्श मंडळ आहे. अशा मंडळाकडून मिळालेला सन्मान माझी जबाबदारी अधिक वाढवणारा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande