नांदेड येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या
नांदेड, 07 मार्च (हिं.स.)। शहरातील हडको भागात होमिओपॅथीचे शिक्षण घेणाऱ्या एका २५वर्षीय विद्यार्थिनीने वैद्यकीय शिक्षण वसतिगृहात गळफास घेऊनआपली जीवनयात्रा संपवली. ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली. या घटनेने नांदेडच्या शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली
नांदेड येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या


नांदेड, 07 मार्च (हिं.स.)। शहरातील हडको भागात होमिओपॅथीचे शिक्षण घेणाऱ्या एका २५वर्षीय विद्यार्थिनीने वैद्यकीय शिक्षण वसतिगृहात गळफास घेऊनआपली जीवनयात्रा संपवली. ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली. या घटनेने नांदेडच्या शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

वाजेगाव येथील रहिवासी असलेली हडको येथील पद्मश्री शामराव कदम होमिओपॅथी महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. महाविद्यालयाजवळच असलेल्या एका खासगी वसतिगृहात ती राहत होती. तिने स्वतःच्या खोलीत गळफास घेतल्याचे समोर येताच नातेवाईक आणि पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.

आत्महत्येमागे वसतिगृह चालकाचा मानसिक त्रास असल्याचा गंभीर आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे. संबंधित वसतिगृह चालक हा राष्ट्रवादीकाँग्रेसचा स्थानिक नेता असल्याचे सांगितले जाते. जोपर्यंत चालकावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका नातेवाइकांनी घेतल्याने विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात मोठा तणाव निर्माण झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande