नववधूच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश
जळगाव , 07 मार्च (हिं.स.)भुसावळ शहरातील एका विवाह सोहळ्यात नववधूच्या दागिन्यांनी भरलेली पर्स चोरीला गेल्याच्या प्रकरणाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मध्य प्रदेशातील राजगढ जिल्ह्यातून चोरी
नववधूच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश


जळगाव , 07 मार्च (हिं.स.)भुसावळ शहरातील एका विवाह सोहळ्यात नववधूच्या दागिन्यांनी भरलेली पर्स चोरीला गेल्याच्या प्रकरणाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मध्य प्रदेशातील राजगढ जिल्ह्यातून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. कारवाईदरम्यान सुमारे १ लाख ९२ हजार ७४० रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले. या कारवाईमुळे आंतरराज्यीय चोरट्यांचे धाबे दणाणले आहेत.

६ फेब्रुवारी रोजी भुसावळ येथील लॉनवर उज्ज्वला प्रबोध भावे यांच्या मुलाचा विवाह सोहळा सुरू होता. लग्न विधी सुरू असताना नववधूचे दागिने एका पर्समध्ये ठेवून सोफ्यावर ठेवण्यात आले होते. दुपारी सुमारे ४ ते ४.३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने ही पर्स लंपास केली. या घटनेनंतर गुन्हा दाखल करण्यात आला.तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीचे विश्लेषण केले असता आरोपी मध्य प्रदेशातील राजगढ जिल्ह्यातील कडिया सांसी येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांचे विशेष पथक मध्य प्रदेशात तळ ठोकून तपास करत होते.तपासात कृषी निरज बेडिया याने चोरी केलेले काही दागिने त्याच्या नातेवाईक सिसोदिया नरोत्तम यांच्याकडे ठेवले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.अखेर उपसरपंच संजय सिसोदिया यांच्या मध्यस्थीने हे दागिने पोलिसांसमोर हजर करण्यात आले. जप्त केलेले दागिने फिर्यादींनी ओळखले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande