नांदेड बाजार समितीचे मैदान बनले डम्पिंग ग्राउंड
नांदेड, 07 मार्च (हिं.स.)। नवा मोंढा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत असून महापालिका प्रशासनाच्या कारभारामुळे सदरील मैदान हे महापालिकेचे डंपिंग ग्राउंड बनले आहे. सदरील कचरा जागेवरच जाळण्यात येत असल्यामुळ
नांदेड बाजार समितीचे मैदान बनले डम्पिंग ग्राउंड


नांदेड, 07 मार्च (हिं.स.)। नवा मोंढा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत असून महापालिका प्रशासनाच्या कारभारामुळे सदरील मैदान हे महापालिकेचे डंपिंग ग्राउंड बनले आहे. सदरील कचरा जागेवरच जाळण्यात येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. मैदानावरील मोकळ्या जागेत मॉर्निंग वॉक व ओपन जिमसाठी येणाऱ्या नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दरम्यान मोंढा मैदानावरील डंपिंग ग्राउंड तातडीने बंद केला नाही तर शिवस्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

नांदेड महापालिका प्रशासनाने स्वछ शहर व सुंदर भारत ची घोषणा करणाऱ्या महापालिका प्रशासनाने अनेक मोकळ्या जागेवर डंपिंग ग्राउंड करत आहेत. २०० कोटी रुपये खर्च करून शहरातील ओला व सुका कचरा उचलण्याचे कंत्राट खाजगी कंपनीला दिले आहे. मात्र सदर कंत्राटदारांने मार्केट कमिटी नवा मोंढा येथील मैदानावर खड्डा खोदून डंपिंग ग्राउंड तयार केले आहे. मैदानावरील बंद पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालयाच्या बाजूला कचरा जमा करण्यास सुरुवात केली आहे. या परिसरात जमा केलेला कचऱ्यांच्या गाड्या ओतण्यासाठी खड्डा खोदून डम्पिंग ग्राउंड बनवले आहे. तो कचरा न उचलता पेटवून दिला जात आहे. तसेच कांही झोपडपट्टीतील

नागरिक त्या खड्याभोवतीचा परिसर प्रातर्विधी उरकण्यासाठी करत आहेत. त्यामुळे दुर्गंधीयुक्त हवा व प्रचंड धुरामुळे सर्वत्र धुके पसरल्याचा भास होत आहे. परिणामी शुद्ध व स्वच्छ वातावरणात फिरायला येणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande