सोलापूर - 10 मार्च रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
सोलापूर, 07 मार्च (हिं.स.)। जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सोलापूर आणि महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने अल्पसंख्यांक नोकरी इच्छूक उमेदवारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण
सोलापूर - 10 मार्च रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा


सोलापूर, 07 मार्च (हिं.स.)। जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सोलापूर आणि महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने अल्पसंख्यांक नोकरी इच्छूक उमेदवारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नोकरी इच्छुक उमेदवारांनी रिझ्यूमच्या तीन प्रती व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त संगीता खंदारे यांनी केले आहे. हा रोजगार मेळावा मंगळवार, दिनांक 10 मार्च 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विजापूर रोड, सोलापूर येथे होणार आहे.

या मेळाव्यात 10 वी, 12 वी, आय.टी.आय. वेल्डर, फिटर, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, ऑफिस असिस्टंट, कोणतीही पदवी, इलेक्ट्रीशियन, मशिन ऑपरेटर, बी.कॉम, एम.कॉम अशा प्रकारच्या 625 पेक्षा जास्त रिक्त पदांची भरती केली जाणार असून 11 उद्योजकांनी ऑनलाईन अधिसूचना दिली आहे. अधिक माहितीसाठी 0217-2992956 या दूरध्वनीवर संपर्क साधावा किंवा https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलला भेट द्यावी.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande