
सोलापूर, 07 मार्च, (हिं.स.)। पंढरपूर पंचायत समिती सभापती उपसभापती निवडणुकीच्या निमित्ताने माजी आमदार प्रशांत परिचारक आणि माढ्याचे शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील हे दोन्ही मातब्बर नेते एकत्र येणार ? अशी चर्चा तालुक्यात सुरु झाली आहे. परिचारक-पाटील एकत्र आले तर तालुक्याच्या राजकारणाची दिशा बदलण्याची शक्यताही या निमित्ताने वर्तवली जात आहे. येत्या 12 मार्च रोजी पंचायत समितीच्या सभापती उपसभापतीची निवड होणार आहे. या निवडीकडे आणि राजकीय घडामोडीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये पंढरपुरात भाजला मोठा फटका बसला. तर राष्ट्रवादी काॅंग्रेसने घवघवीत यश मिळवत पंचायत समितीमध्येही बाजी मारली. पंचायत समितीच्या 16 जागांपैकी 8 जागा परिचारक विरोधी गटाला मिळाल्याने पंचायत समिती सभापती उपसभापती निवडीचा पेच निर्माण झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड