नांदेड - धनज येथील नाफेडच्या मॉडेल खरेदी केंद्रावर तूर व हरभरा खरेदीस शुभारंभ
नांदेड, 07 मार्च, (हिं.स.)। मुखेड तालुक्यातील धनज येथील मृष्णेश्वर फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड धनज येथे शासनाच्या कडधान्य आत्मनिर्भर अभियान अंतर्गत तूर व हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. नाफेडच्या मॉडेल खरेदी केंद्र म्हणून ओळख असलेल्
नांदेड - धनज येथील नाफेडच्या मॉडेल खरेदी केंद्रावर तूर व हरभरा खरेदीस शुभारंभ


नांदेड, 07 मार्च, (हिं.स.)। मुखेड तालुक्यातील धनज येथील मृष्णेश्वर फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड धनज येथे शासनाच्या कडधान्य आत्मनिर्भर अभियान अंतर्गत तूर व हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.

नाफेडच्या मॉडेल खरेदी केंद्र म्हणून ओळख असलेल्या धनज मुखेड येथील मृप्नेश्वर फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड धनज येथील खरेदी केंद्रावर शासनाच्या कडधान्य आत्मनिर्भर अभियानाअंतर्गत तूर आणि हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभमृष्नेश्वर फार्मर प्रोडूसर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री प्रल्हाद पाटील बोडके यांच्या शुभहस्ते विधिवत वजन काट्याची पूजा करून खरेदीस प्रारंभकरण्यात आला आहे.

यावेळी एकलारा येथील शेतकरी दिगंबर पाटील हसणाळे व प्रतनिरीक्षक (ग्रेडर) बालाजीराव बोडके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर केंद्र हे नाफेड अंतर्गतचे मॉडेल खरेदी केंद्र असून या ठिकाणी विक्रीस आणलेल्या मालाचे मूल्य (पैसे) शासनाला माल पोहोचल्याच्या 48 तासात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.

शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची रक्कम

(मोबदला) तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची सुविधा या नाफेडच्या मॉडेल खरेदी केंद्रावर उपलब्ध आहे. तरी परिसरातील शेतकऱ्यांनी आपले कडधान्य तूर आणि हरभरा धनंजय येथील नाफेडच्या मॉडेल खरेदी केंद्रावर विक्रीस आणावा असे आवाहन मृष्णेश्वर फार्मर प्रोडूसर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रल्हाद पाटील बोडके यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande