सोलापूरात रंगपंचमीसाठी बाजारपेठेत राजकीय नेत्यांच्या फोटोच्या पिचकाऱ्या
सोलापूर, 07 मार्च (हिं.स.)। यंदाची रंगपंचमी सोलापूरकरांसाठी काहीशी वेगळी ठरणार आहे. शहरातील टिळक चौक, मधला मारुती, सात रस्ता आणि नवी पेठ यांसारख्या प्रमुख बाजारपेठा रंगांनी बहरून गेल्या असतानाच, यंदा बाजारात एक नवा राजकीय ट्रेंड पाहायला मिळत आहे.
सोलापूरात रंगपंचमीसाठी बाजारपेठेत राजकीय नेत्यांच्या फोटोच्या पिचकाऱ्या


सोलापूर, 07 मार्च (हिं.स.)।

यंदाची रंगपंचमी सोलापूरकरांसाठी काहीशी वेगळी ठरणार आहे. शहरातील टिळक चौक, मधला मारुती, सात रस्ता आणि नवी पेठ यांसारख्या प्रमुख बाजारपेठा रंगांनी बहरून गेल्या असतानाच, यंदा बाजारात एक नवा राजकीय ट्रेंड पाहायला मिळत आहे.राजकारणात जशी भारतीय जनता पार्टी चर्चेत आहे, तशीच यंदाच्या रंगांच्या बाजारातही भाजपच्या दिग्गज नेत्यांचीच जादू पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे फोटो असलेल्या पिचकाऱ्यांनी बाजारपेठ व्यापली आहे. या पिचकाऱ्यांचे विशेष आकर्षण म्हणजे या थेट दिल्लीच्या बाजारपेठेतून सोलापूरमध्ये दाखल झाल्या आहेत, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली.कार्टून आणि साध्या पिचकाऱ्यांपेक्षा यंदा राजकीय पिचकाऱ्यांना ग्राहकांकडून सर्वाधिक मागणी आहे. राजकारणात सध्या भाजप टॉपला असल्याचे चित्र असून, त्याचे प्रतिबिंब रंगांच्या उत्सवातही उमटल्याचे दिसून येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande