सोलापूरचा पारा ४० अंशाकडे, उन्हाच्या तीव्र चटक्यामुळे दुपारी शहरात शुकशुकाट
सोलापूर, 07 मार्च (हिं.स.)। सोलापूर शहरात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत चालला असून आज तापमानाने ३९.५° सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. विशेष म्हणजे, गेल्या ७२ तासांत तापमानाचा आलेख सातत्याने वर जात असल्याने सोलापूरकर उन्हाने हैराण झाले आहेत.हवामान का
temp Solparu


सोलापूर, 07 मार्च (हिं.स.)।

सोलापूर शहरात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत चालला असून आज तापमानाने ३९.५° सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. विशेष म्हणजे, गेल्या ७२ तासांत तापमानाचा आलेख सातत्याने वर जात असल्याने सोलापूरकर उन्हाने हैराण झाले आहेत.हवामान कार्यालय, सोलापूर यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार आज कमाल तापमान ३९.५° से. (१०३.१° फॅ.) नोंदवले गेले. तर किमान तापमान १९.५° से. (६७.१° फॅ.) इतके होते. हवेतील आर्द्रता घटून २८% वर आल्यामुळे वातावरणात कोरडेपणा वाढला आहे, परिणामी उन्हाच्या झळा अधिक तीव्रतेने टोचत आहेत.गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत आज उन्हाचा तडाखा जास्त असल्याने दुपारी १२ ते ४ या दरम्यान शहरातील मुख्य बाजारपेठा आणि रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला. वाढत्या उष्णतेमुळे शीतपेये, शहाळी आणि रसवंती गृहांवर नागरिकांची गर्दी वाढत आहे.हवामान विभागाचा अंदाज: येणाऱ्या २-३ दिवसांत तापमानाचा हा पारा ४०° सेल्सिअसचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळी कामाशिवाय बाहेर पडू नये.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande