तळेगाव दाभाडे येथे हत्तीरोग रुग्ण आढळला
पुणे, 07 मार्च (हिं.स.)। तळेगाव दाभाडे येथील भोई आळी परिसरात हत्ती रोगाचा रुग्ण असल्याची माहिती मिळताच या प्रभागाच्या नगरसेविका शोभा परदेशी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे संपर्क साधून त्या रुग्णाच्या अवतीभवतीच्या शंभर मीटरच्या अंतरात राहणाऱ्या
तळेगाव दाभाडे येथे हत्तीरोग रुग्ण आढळला


पुणे, 07 मार्च (हिं.स.)।

तळेगाव दाभाडे येथील भोई आळी परिसरात हत्ती रोगाचा रुग्ण असल्याची माहिती मिळताच या प्रभागाच्या नगरसेविका शोभा परदेशी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे संपर्क साधून त्या रुग्णाच्या अवतीभवतीच्या शंभर मीटरच्या अंतरात राहणाऱ्या 89 लोकांच्या रक्ताची तपासणी करून घेतली . 55 वर्षीय रुग्णास गेली वर्षभर डीइसी औषध चालू आहे. त्यामुळे या रुग्णापासून इतरांना या आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी असली तरी खबरदारी म्हणून आजूबाजूच्या लोकांची रक्त तपासणी करण्यात आल्याची माहिती मिळाली.हत्तीरोग हा क्यूलेक्स डासाची मादी चावल्यामुळे होतो. हत्तीरोग झालेल्या व्यक्तीला हा डास चावला व त्यानंतर इतरांना चावल्यास या रोगाचा प्रसार होऊ शकतो. रात्री सुमारे आठ नंतर हे डास सक्रिय होतात. या आजारामध्ये हात, पाय, कान या अवयवांना सूज येते. तरी नागरिकांनी आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवावा. पाणीसाठा करून ठेवू नये असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभाडेचे आरोग्य निरीक्षक डॉ. दीपक ढवळे यांनी केले आहे .

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande