माहूर तालुक्यातील इवळेश्वर येथे जल अर्पण दिवस साजरा
नांदेड, 07 मार्च (हिं.स.)। जल जीवन मिशनच्या हर घर, नल से जल या योजनेअंतर्गत गावातील प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे नियमित पाणीपुरवठा करण्यात येत असून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शुद्ध व सुरक्षित पाणी देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, त्यामुळे गावकरी समाधा
माहूर तालुक्यातील इवळेश्वर येथे जल अर्पण दिवस साजरा


नांदेड, 07 मार्च (हिं.स.)।

जल जीवन मिशनच्या हर घर, नल से जल या योजनेअंतर्गत गावातील प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे नियमित पाणीपुरवठा करण्यात येत असून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शुद्ध व सुरक्षित पाणी देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, त्यामुळे गावकरी समाधानी आहेत, असे प्रतिपादन इवळेश्वरच्या सरपंच वंदनाताई दुधराम राठोड यांनी जल अर्पण दिवस कार्यक्रमात केले. केंद्र व राज्य शासनाच्या वतीने जल जीवन मिशन अंतर्गत 'हर घर नल से जल' घोषित गावांमध्ये नियमित पाणीपुरवठा सुरू असलेल्या ठिकाणी जल अर्पण दिवस साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार माहूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील इवळेश्वर येथे हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी आरोग्य विस्तार अधिकारी शिवचरण जाधव यांनी सांगितले की, गावात नियमित पाणीपुरवठ्यासोबतच गुणवत्तापूर्ण पाणी देण्यावरही भर देण्यात येत असून पुढील काळातही हा पुरवठा सातत्याने सुरू राहावा यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. माहूर तालुक्याचे उपविभागीय अभियंता प्रमोद बनसोड यांनी सांगितले की, गावातील पाणीपुरवठा योजना जलदगतीने व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यात आली असून गावातील सर्व कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आली आहे. भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन ही योजना उभी करण्यात आली असून गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे प्रशासनाला ही योजना यशस्वीपणे राबवता आली. यावेळी पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात आली.

कार्यक्रमाच्या निमित्ता ग्रामस्थांच्या सहभागातून ग्रामस्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयापासून नळ योजनेच्या पाण्याच्या टाकीपर्यंत व गावातील मुख्य रस्त्यांवरून जल रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये शालेय विद्यार्थी, महिला, ग्रामस्थ तसेच गावातील शासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सहभागी नागरिकांनी पाणी संवर्धनासंबंधी घोषवाक्यांचे फलक हातात घेऊन जनजागृतीपर घोषणा दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande