ठाणे मनपा शाळा क्र. 18 मधील विद्यार्थ्यांनी गिरवले कथ्थकचे धडे
ठाणे, 07 मार्च (हिं.स.)। : ठाणे महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांमधील अंगभूत कलागुणांना वाव मिळावा आणि भारतीय शास्त्रीय कलेची ओळख व्हावी या उद्देशाने विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सरिता काळे यांन
ठाणे


ठाणे, 07 मार्च (हिं.स.)। : ठाणे महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांमधील अंगभूत कलागुणांना वाव मिळावा आणि भारतीय शास्त्रीय कलेची ओळख व्हावी या उद्देशाने विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सरिता काळे यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकार कथ्थकचा इतिहास, परंपरा आणि वैशिष्ट्ये याबाबत सविस्तर माहिती दिली.

परबवाडी येथील शाळा क्र 18 चे मुख्याध्यापक राजेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. कथ्थक नृत्यांगना सरिता काळे यांनी कथ्थक नृत्याचे प्रभावी सादरीकरण करून विद्यार्थ्यांना विविध मुद्रा, ताल, पादचाल आणि अभिव्यक्ती यांचे प्रात्यक्षिक दाखवले. या सादरीकरणामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष नृत्यकलेचा अनुभव मिळाला. अनेक विद्यार्थ्यांनी उत्साहाने प्रश्न विचारत नृत्यकलेबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमाचे आयोजन SPIC MACAY यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. या उपक्रमामुळे ठाणे महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांमधील कलागुण विकसित होण्यास प्रोत्साहन मिळाले असून भारतीय संस्कृती व शास्त्रीय कलेबद्दलची आवड वाढण्यासही मदत झाली. कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande