छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाला जिल्ह्यात प्रारंभ
छत्रपती संभाजीनगर, 08 मार्च (हिं.स.)। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात सुरु झाले आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रशासकीय अधिकारी व तहसीलदार यांनी संबंधित तालुक्यात स
Q


छत्रपती संभाजीनगर, 08 मार्च (हिं.स.)।

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात सुरु झाले आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रशासकीय अधिकारी व तहसीलदार यांनी संबंधित तालुक्यात समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे, डिजिटल सातबारा वैधता, महसूल सेवा सुलभ करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या समाधान शिबिरात औंढा नागनाथ तालुक्यातील 45 पोलीस पाटलांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच 75 फेरफार प्रकरणे निकाली काढण्यात आली व सातबारा दुरुस्तीचे 4 अर्ज स्वीकारण्यात आले. याशिवाय नवीन शिधापत्रिका देणे, शिधापत्रिकेत नावे समाविष्ट करणे, विविध शासकीय योजनांची माहिती देणे तसेच 199 प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

यावेळी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या अर्जांचे पत्र लाभार्थ्यांना देण्यात आले. ग्रामपंचायत अंतर्गत जन्म-मृत्यू दाखल्यांचे वाटप करण्यात आले तसेच सातबारा व गाव नमुना 8-अ ची प्रत लाभार्थ्यांना वितरित करण्यात आली.

शिबिरात विविध विभागांचे माहितीपर स्टॉल लावण्यात आले होते. महसूल विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध सुधारणांची माहिती नागरिकांना देण्यात आली.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande