ठाणे - ज्ञानपीठ विद्यालयात सौर ऊर्जा प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न
ठाणे, 08 मार्च (हिं.स.)। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मनोरमानगर परिसरातील ज्ञानपीठ एज्युकेशन सोसायटीचे ज्ञानपीठ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय जीवन संग्राम मैदान मनोरमानगर ठाणे या विद्यालयात MAFFFLकंपनी व सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त
ठाणे


ठाणे, 08 मार्च (हिं.स.)। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मनोरमानगर परिसरातील ज्ञानपीठ एज्युकेशन सोसायटीचे ज्ञानपीठ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय जीवन संग्राम मैदान मनोरमानगर ठाणे या विद्यालयात MAFFFLकंपनी व सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आले व त्यानिमित्ताने भव्य दिव्य उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या उद्घाटन सोहळ्यासाठी MAFFFL कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्मा.श्री. सतीश पाटणकर तसेच मुख्य व्यवस्थापक वित्त सन्मा. श्री. अजय देवळे, सेवा सहयोग फाउंडेशनचे संचालक सन्मा.श्री. रितेश मनियार ,प्रमुख संचालक सन्मा.श्री. आकाश गुप्ते, प्रकल्प व्यवस्थापक सन्मा.श्री. राजेश शेट्टी, प्रकल्प समन्वयक सन्मा.श्री भोजराज भट्ट तसेच या प्रोजेक्ट पर्यंत घेऊन जाणारे दत्ताजी घाडगे, ज्ञानपीठ एज्युकेशन सोसायटीचे सचिव भगवान पाटील, खजिनदार. बबन चव्हाण माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रभाकर पाटील, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीम. माधुरी ढवळे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग यांच्या उपस्थिती मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

प्रथम संस्थेच्या वतीने मान्यवर पाहुण्यांचे यथोचित स्वागत करण्यात आले .त्यानंतर सोलार पॅनल -सोलार मीटर चे मान्यवरांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतपर भाषणातून ज्ञानपीठ विद्यालयात सोलार प्रकल्प उभारल्याबद्दल मान्यवरांचे आभार व्यक्त केले. तसेच सोलार प्रकल्पाविषयी विद्यार्थ्यांनी छान अशी माहिती सर्वांना दिली. त्यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. प्रभाकर पाटील यांनी आपल्या मनोगतातून ज्ञानपीठ एज्युकेशन सोसायटीचा पूर्व इतिहास, संचालकांनी घेतलेले अथक परिश्रम व विद्यालयात चालणारे विविध उपक्रम व प्रगतीचा आलेख सर्व मान्यवरांसमोर व्यक्त करून सौर ऊर्जा प्रकल्प विद्यालयाला प्रदान केल्याबद्दल मॅफल कंपनी व सेवा सहयोग फाउंडेशनचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. त्यानंतर ज्ञानपीठ एज्युकेशन सोसायटीचे सचिव सन्मा.श्री. भगवान पाटील व खजिनदार सन्मा.श्री. बबन चव्हाण यांनी संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांना आभार पत्र देऊन त्यांच्या प्रति ऋण व्यक्त केले. त्यानंतर अध्यक्षीय मनोगतातून सन्माननीय श्री. सतीश पाटणकर साहेब यांनी विद्यालयात चालणाऱ्या विविध उपक्रमांचे मनःपूर्वक कौतुक केले. तसेच आमचा सौर ऊर्जा प्रकल्प योग्य ठिकाणी दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच उत्तरोत्तर विद्यालयाची प्रगती होत राहो आणि सौर ऊर्जा प्रकल्पाचा उपयोग संपूर्ण विद्यालयाला होवो अशी भावना व्यक्त केली. त्यानंतर सूत्रसंचालक श्री. राजेश शिंगाडे सर यांनी सर्वांचे आभार व्यक्त करतानाच हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीबाबत

शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सुमधुर गीतांबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले .

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande