
नांदेड, 01 एप्रिल, (हिं.स.)। जि. प. प्रा. शाळा लक्कडकोट येथे केंद्रीय शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेला मोहपुर केंद्राचे केंद्रप्रमुख तसेच जि. प. प्रा. शाळा सिंदगी तांडा येथील मुख्याध्यापक कवटीकवार हे अध्यक्ष व प्रशासकीय मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. गट ग्रामपंचायत लक्कडकोट व ग्रामपंचायत मारेगाव (खालचे) येथील सरपंच गणपत भोपे यांनी उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाच्या प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर जि. प. प्रा. शाळा लक्कडकोट येथील चौथीतील विद्यार्थिनी समृद्धी किशोर शिंदे हिने स्वागत गीत
सादर केले. कार्यक्रमातील प्रमुख पाहुणे म्हणून ग.णू जाधव, सचिन नरवाडे, चंद्रशेखर सर्प उपस्थित होते. मोहपुर केंद्र शाळेची राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा म्हणून निवड झाल्याबद्दल संबंधित शिक्षक व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यानंतर उपाध्यक्ष गणपत भोपे यांनी मार्गदर्शन केले. .
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis