
नांदेड, 01 एप्रिल, (हिं.स.)। मराठवाड्याचे पहिले 'व्हॅस्कुलर आणि एंडोव्हॅस्कुलर सर्जन' डॉ. मनोज शंकरराव हंबर्डे यांनी वैद्यकीय क्षेत्रात एक मोठी कामगिरी केली आहे. त्यांचे 'क्रॉनिक लिंब थ्रेटनिंग इस्कॅमिया' (CLTI) म्हणजेच पाय गमावण्याची भीती असलेल्या रुग्णांवरील संशोधन नुकतेच प्रतिष्ठित 'इंडियन जर्नल ऑफ व्हॅस्कुलर अँड एंडोव्हॅस्कुलर सर्जरी' (IJVES) मध्ये प्रसिद्ध झाले आहे.
संशोधनाचे महत्त्व, मधुमेहामुळे किंवा पायातील रक्तवाहिनी मधील अडथळ्यांमुळे (Arterial Occlusion) ज्या रुग्णांचे पाय कापण्याची वेळ येते, अशा रुग्णांवर पायातील रक्तवाहिनी मध्ये 'अँजिओप्लास्टी (Angioplasty)' करताना वापरल्या जाणाऱ्या एका विशेष तंत्रावर (Short Balloon Inflation) हे संशोधन आधारित
आहे. अशा प्रकारचे हे महाराष्ट्रातील पहिलेच संशोधन असून, गुडघ्याखालील रक्त वाहिन्यांच्या (Infrapopliteal) उपचारांसाठी या तंत्राचा वापर करणारे हे जगातील पहिलेच प्रकाशित संशोधन ठरले आहे. स्थानिक रुग्णांना मोठा दिलासा मिळेल डॉ. मनोज हंबर्डे हे मराठवाडा विभागातील पहिलेच पूर्णवेळ 'व्हॅस्कुलर अँड एंडोव्हॅस्कुलर सर्जन' (Vascular & Endovascular Surgeon) आहेत. आतापर्यंत अशा गंभीर आजारांसाठी रुग्णांना मुंबई, पुणे किंवा हैदराबादला धाव घ्यावी लागत असे. मात्र, डॉ. मनोज हंबर्डे यांच्या रूपाने आता जागतिक दर्जाची 'व्हॅस्कुलर केअर' सेवा लवकरच नांदेड व मराठवाड्यामध्ये उपलब्ध होणार आहे. यामुळे शेकडो रुग्णांचे पाय कापण्या पासून वाचवणे आता स्थानिक पातळीवर शक्य होईल. लवकरच ते हंबर्डे उरोकेअर येथे या संबंधी रुग्णाची ते तपासणी सुरू करणार असुन मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये रुग्णांची नावनोंदणी करून तपासणी करणार आणि जागतिक दर्जाचा उपचार सुरू करणार असल्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis