लातूरमधील वलांडी परिसरात तलावांची पाणीपातळी घटली
लातूर, 01 एप्रिल (हिं.स.)देवणी तालुक्यातील वलांडी परिसरात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. मार्च महिन्यातच तापमानाने ३८ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडल्याने नागरिक, पशुपक्षी आणि वन्यजीव यांना प्रखर उकाड्याचा मोठा सामना करावा लागत आहे. यंदा पावसाचे प्
पाणीसाठा


लातूर, 01 एप्रिल (हिं.स.)देवणी तालुक्यातील वलांडी परिसरात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. मार्च महिन्यातच तापमानाने ३८ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडल्याने नागरिक, पशुपक्षी आणि वन्यजीव यांना प्रखर उकाड्याचा मोठा सामना करावा लागत आहे. यंदा पावसाचे प्रमाण समाधानकारक असतानाही प्रखर उष्णतेमुळे गावातील प्रमुख तलाव व पाणीसाठे मार्च महिन्यापासूनच आटू लागले आहेत. पाणीपातळी झपाट्याने घटत असल्याने शेतकरी, पशुपालक आणि ग्रामस्थ चिंताग्रस्त झाले आहेत. उन्हाळ्याची केवळ सुरुवात असून पुढील महिन्यांत पाणीटंचाई गंभीर रूप धारण करण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वलांडीसह परिसरातील पाझर तलाव आणि साठवण तलावांमधील जलसाठा अपेक्षेपेक्षा कमी असून काही तलावांचा तळ दिसू लागला आहे. ज्वारी, गहू, फळभाज्यांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पाणीउपशामुळे परिस्थिती आणखी बिकट होत आहे. हवामान विभागाने एप्रिल ते जून दरम्यान उष्णतेत मोठी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला असून मे महिन्यात तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे उन्हाळ्यातील पाणीटंचाई आणखी गडद होऊ शकते, असा इशारा तज्ञांनी दिला आहे.

तापमान उंचावले, जलसाठे अटू लागले पुढील ३ महिने पाणी टंचाईचे संकट !

शुधनाला पाण्याचा तुटवडा : पशुपालकांची वाढती चिंता वलांडी व परिसरातील गुरेढोरे यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवत असून अनेक ठिकाणी चराई क्षेत्रे पूर्णपणे कोरडी पडली आहेत. जनावरे पाण्यासाठी भटकंती करताना दिसत असून पशुसंवर्धन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तालुक्यातील विहिरी, बोअरवेल आणि तलाव जलद गतीने कोरडे पडत आहेत. महिलांना व शेतकऱ्यांना पिण्याचे व सांडपाणी मिळवण्यासाठी लांब अंतर कापावे लागत असून पशुधनालाही वनवन फिरावे लागत आहे. आगामी तीन महिने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने तत्काळ उपाययोजना न केल्यास तीव्र पाणीटंचाई निर्माण होऊ शकते, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

परिसरातील साठवण तलावांचा उपलब्ध पाणीसाठा (टक्केवारीत)

दवणहिप्परगा ६४.४९%, लासोना ४३.७१%, आनंदवाडी ४१.३३%, बोरोळ ४६.५७%, गूरनाळ ४६.३१%, वागदरी ४५.६१%, आनंतवाडी ४१.३७%, वडमूरंबी ५५.५७%

देवणी तालुक्याची 'अर्धवाहिनी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धनेगाव उच्चस्तरीय बांधाऱ्यात सध्या ५१.४५% पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता डी. जे. कोल्हे यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande