पालखी सोहळ्याचा पुणे मुक्कामाचा अंतिम निर्णय आळंदीत घेतला जाणार
पुणे, 01 एप्रिल, (हिं.स.)। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा पुण्यात दोन दिवस मुक्काम राहणार आहे. भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरातील मुक्कामाची जागा बदलली, असे दिशाभूल करणारे वृत्त पूर्णतः चुकीचे आहे. मुक्कामाचे ठिकाण बदलण्याचा कोणताही निर्णय
Alandi wari


पुणे, 01 एप्रिल, (हिं.स.)। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा पुण्यात दोन दिवस मुक्काम राहणार आहे. भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरातील मुक्कामाची जागा बदलली, असे दिशाभूल करणारे वृत्त पूर्णतः चुकीचे आहे. मुक्कामाचे ठिकाण बदलण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. पालखी विठोबा मंदिरात काही गैरसोयी आहेत. त्यामुळे प्रशासन, लोकप्रतिनिधी, दिंडी समाज संघटना यांच्याशी चर्चा करून सर्वांनुमते १३ एप्रिल रोजी अंतिम निर्णय आळंदीत घेतला जाईल,’’ अशी भूमिका संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप यांनी पत्रकार परिषदेत मांडली.संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे आळंदीतून आठ जुलैला प्रस्थान होणार आहे. नऊ आणि दहा जुलैला हा सोहळा पुणे मुक्कामी असेल.

दरम्यान, पुण्यात दोनऐवजी एक दिवसाचा मुक्काम आणि मुक्कामाच्या जागा बदलण्याबाबत चुकीचे वृत्त काही ठिकाणी प्रसिद्ध झाले.त्यामुळे वारकरी, नागरिकांत दिशाभूल होऊ नये यासाठी आळंदी देवस्थानने ही पत्रकार परिषद घेतली. या वेळी प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त योगी निरंजनाथ, चैतन्य महाराज कबीर, ॲड. रोहिणी पवार, पुरुषोत्तम महाराज पाटील, पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफळकर, भाऊ महाराज हरपळे आदी उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande