
भंडारा, 01 एप्रिल (हिं.स.) - तुमसर तालुक्यातील रोंघा या गावांमध्ये 31 मार्चपासून दोन मुलं बेपत्ता झाली होती. त्यांची रात्रभर शोधाशोध केल्या असता कुठेच ते सापडलेले नाही परंतु सकाळी एका छोट्याश्या गड्ड्यामध्ये त्यांचे पार्थिव आढळून आले. मृतकाचे नाव चंद्रकांत रूपचंद कुंबरे (7) ,सामर्थ संजय उईके (6) असे आहे. काल गावा शेजारी असलेल्या छोट्याश्या खड्ड्यात पाणी असल्याने आंघोळ करायला गेले होते. गावातील दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला असल्याने गावात शोककळा पसरली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Pravin Tandekar