भंडारा : महिलेवर वाघाचा हल्ला
भंडारा, 01 एप्रिल (हिं.स.) : भंडाऱ्याच्या साकोली तालुक्यातील आमगाव बुद्रुक परिसरात पुन्हा एकदा वाघाने शेतात काम करत असलेल्या महिलेवर हल्ला केल्याची घटना घडली. छाया सुधाकर मुंगमोळे (वय 43 वर्षे ) असे जखमी महिलेचे नाव असून आमगाव बुद्रुक येथे सदर महिल
भंडारा : महिलेवर वाघाचा हल्ला


भंडारा, 01 एप्रिल (हिं.स.) : भंडाऱ्याच्या साकोली तालुक्यातील आमगाव बुद्रुक परिसरात पुन्हा एकदा वाघाने शेतात काम करत असलेल्या महिलेवर हल्ला केल्याची घटना घडली. छाया सुधाकर मुंगमोळे (वय 43 वर्षे ) असे जखमी महिलेचे नाव असून आमगाव बुद्रुक येथे सदर महिला शेतात मुलासह तुरीच्या वाळलेल्या काड्या आणण्यासाठी गेली होती. दरम्यान काम करत असताना वाघाने तिच्यावर हल्ला चढवला. मात्र तितक्या तिच्या मुलगा आरडाओरड करत धावून आल्याने वाघ पळुन गेला. चार ते पाच किलोमीटर परिसरातील ही 15 दिवसात तिसरी घटना असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. वनविभागाने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. गंभीर जखमी महिलेला उपचारार्थ नागपूर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Pravin Tandekar


 rajesh pande