बीड - धुनकवाड येथे धुनकेश्वर यात्रा उत्साहात संपन्न
बीड, 01 एप्रिल, (हिं.स.)। धुनकवाड येथील ग्रामदैवत धुनकेश्वराची यात्रा विविध धार्मिक आणि पारपंरिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. धुनकवाड नं.१ येथून पारंपरिक पद्धतीने ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत यात्रेला सुरुवात झाली. गावात
बीड - धुनकवाड येथे धुनकेश्वर यात्रा उत्साहात संपन्न


बीड, 01 एप्रिल, (हिं.स.)। धुनकवाड येथील ग्रामदैवत धुनकेश्वराची यात्रा विविध धार्मिक आणि पारपंरिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. धुनकवाड नं.१ येथून पारंपरिक पद्धतीने ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत यात्रेला सुरुवात झाली. गावातील प्रमुख मार्गावरून निघालेली मिरवणूक धुनकवाड नं. २ येथे पोहोचली. यावेळी कावडी व काठी घेऊन भक्तांनी सहभाग घेतला.

यात्रेदरम्यान तरुणांनी लेझीम सादर केले. हर हर महादेवच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. मिरवणूक महादेव मंदिरात पोहोचली, जिथे विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. धुनकेश्वर देवस्थान समिती व ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande