धारणीच्या लवादाजवळ भीषण अपघात पीकअप पुलाखाली कोसळली, 2 ठार
अमरावती, 01 एप्रिल (हिं.स.) धारणीपासून १५ किलोमीटर अंतरावरील अमरावती बुरहानपुर महामार्गावरील लवादा गावाजवळ सकाळी पीकअपचा गंभीर अपघात झाला. पूलाजवळचालकाचा ताबा सुटल्याने पीक अप पुलाखाली कोसळून २ जण जागीच ठार झाले तर ६ जण गंभीर जखमी झाले आहे. यापैक
धारणीच्या लवादाजवळ भीषण अपघात पीकअप पुलाखाली कोसळली, 2 ठार


अमरावती, 01 एप्रिल (हिं.स.)

धारणीपासून १५ किलोमीटर अंतरावरील अमरावती बुरहानपुर महामार्गावरील लवादा गावाजवळ सकाळी पीकअपचा गंभीर अपघात झाला. पूलाजवळचालकाचा ताबा सुटल्याने पीक अप पुलाखाली कोसळून २ जण जागीच ठार झाले तर ६ जण गंभीर जखमी झाले आहे.

यापैकी चालक राम व चांदनी नामक मुलीला अमरावती जिल्हा सामान्य रूग्णालयात रेफर करण्यात आले आहे. राम कोल्हे (३१) हा शेतात कामासाठी लवादा गावातून ८ मजुरांना घेऊन शेताकडे पीकअप वाहनाद्वारे निघाला होता. पूलाजवळ रात्रीच्या वादळामुळे कचरा व लाकुडफाटा पडलेला होता. यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला व वाहन पलटी झाली. या अपघातात माली मिठाराम भिलावेकर (१८, रा. लवादा, ता. धारणी) तथा समाय चुन्नीलालसावलकर (४५, रा. लवादा) ही महिला जागीच ठार झाली. सर्व जखमींना कोल्हे कुटुंबाच्या मदतीने व शासकीय रूग्णाहिकेद्वारे धारणी उपजिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. चालक राम व चांदनी जांबेकर (१९) यांना गंभीर जखमी अवस्थेत जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठविण्यात आले. पीकअप वाहनाचा चालक वगळता सर्व महिला आहेत. ही घटना मेळघाट मधील अलई नावाच्या पुलाजवळ हा अपघात घडला. अपघातामुळे पीकअप क्र. एम.एच.२७बी. एक्स ८६५५चे देखिल खूप नुकसान झाले आहे. उशिरा प्राप्त माहितीप्रमाणे राम कोल्हेला रात्री नागपूरला हलविण्यात आले आहे. मेळघाटचे आ. केवलराम काळे तथा भाजप जिल्हाध्यक्ष मेळघाट प्रभुदास भिलावेकर यांनी धारणी उपजिल्हा रूग्णालयात पीडितांची भेट घेऊन विचारपूस केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande