
लातूर, 01 एप्रिल, (हिं.स.)। लातूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापतीपदी भाजपाच्या शिवकन्या महेंद्र गोडभरले यांची बिनविरोध निवड झाली असून या निवडीबद्दल भाजपाचे नेते आ. रमेशअप्पा कराड यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील रेणापूर तालुक्यातील खरोळा जिल्हा परिषद गटातून बहुमताने विजयी झालेल्या भाजपाच्या शिवकन्या महेंद्र गोडभरले यांची लातूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. निवड जाहीर झाल्यानंतर भाजपाच्या संवाद कार्यालयासमोर फटाके फोडून नूतन सभापती शिवकन्या गोडभरले यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
आ. रमेशअप्पा कराड यांनी नूतन सभापती शिवकन्या गोडभरले यांचा यथोचित सत्कार करून अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील अंगणवाडीसह महिलांचे व इतर प्रश्नाची निश्चितपणे सोडवणूक होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी भाजपा किसान मोचार्चे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमकाका शिंदे, जिप सदस्य महादेव साळुंखे, छाया पद्माकर चिंचोलकर, महेंद्र गोडभरले, प्रताप पाटील, सुरज शिंदे, अनिल भिसे, राजकिरण साठे, प्रताप राऊतराव, सुरेंद्र गोडभरले, लक्ष्मण यादव, निवृत्ती चिद्रे, सुधाकर काळे, रमाकांत फुलारी, चंद्रकांत कातळे, संतोष चव्हाण, रुपेश काळे, अशोक सावंत, यांच्यासह अनेकांनी नवनिर्वाचित सभापती शिवकन्या महेंद्र गोडभरले यांचे अभिनंदन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis