नांदेड - 'स्टेप बाय सेटट्राईब' आयटी प्रशिक्षण संस्थेचा भव्य शुभारंभ
नांदेड, 01 एप्रिल, (हिं.स.)। ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी कार्य करणाऱ्या किनवटस्थित, महाराष्ट्र शासन पुरस्कारप्राप्त ''सेटट्राईब'' या आयटी कंपनीने - पुणे येथे ''स्टेप बाय सेटट्राईब'' या नावीन्यपूर्ण आयटी प्रशिक्षण उपक्रमाचा भव्य शुभारंभ केला.
नांदेड - 'स्टेप बाय सेटट्राईब' आयटी प्रशिक्षण संस्थेचा भव्य शुभारंभ


नांदेड, 01 एप्रिल, (हिं.स.)। ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी कार्य करणाऱ्या किनवटस्थित, महाराष्ट्र शासन पुरस्कारप्राप्त 'सेटट्राईब' या आयटी कंपनीने - पुणे येथे 'स्टेप बाय सेटट्राईब' या नावीन्यपूर्ण आयटी प्रशिक्षण उपक्रमाचा भव्य शुभारंभ केला. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमाचे उद्घाटन - महादेवअण्णा कोंढरे - (कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, - पुणे जिल्हा), साजिद अल्वी (संचालक, ज्ञानसागर इन्स्टिट्यूट - डीआयएमआर, - पुणे) आणि सेवानिवृत्त एसीपी मंदार नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी जयेश काटकर (झील शिक्षण संस्था), नरेंद्र बराटे

(संस्थापक, सीड इन्फोटेक), चारुदत्त बोधनकर (कार्यकारी संचालक, लोटस बिझनेस स्कूल) आणि आशिष वाडकर (कॅट इंडिया) प्रमुख उपस्थित होते.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता, जिद्द आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घातल्यास ते शहरांच्या पलीकडेही यशस्वी होऊ शकतात, याचे उदाहरण 'सेटट्राईब' या संस्थेने घालून दिले आहे. साधारणतः मोठे ब्रँड्स शहरातून गावाकडे विस्तार करतात; मात्र किनवटमध्ये उगम पावलेला 'सेटट्राईब' हा ब्रेड आता पुण्यासारख्या आयटी हबमध्ये १०० आसनक्षमतेच्या आधुनिक कार्यालयातून कार्यरत झाला आहे.

या उपक्रमाचे विशेष

वैशिष्ट्य म्हणजे, 'स्टेप बाय सेटट्राईब'चे संपूर्ण नेतृत्व किनवटमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांकडेच असणार आहे. ही बाब जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरत आहे. कार्यक्रमाला आयटी तज्ञ राजेश वर्तक, आयएसओ तज्ञ जितेंद्र कारखानीस, एसएपी तज्ज्ञ पंकज वाघमारे, सेंट्रल स्कूलचे संचालक अफझल पीरजादे, प्रा. इफ्तिकार खान, फहाद इलियाझ, माजी सरपंच शिवाजी धुमाळ, सचिन निंबाळकर, नचिकेत जोशी तसेच जेष्ठ पत्रकार प्रदीप वाकोडीकर यांच्यासह आयटी व प्रशिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

पुण्यातील विविध नामांकित महाविद्यालये, आयटी प्रशिक्षण संस्था आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना एआय-आधारित सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, अत्याधुनिक कोडिंग प्रशिक्षण, लाईव्ह प्रोजेक्ट्स, शासनाच्या विविध सॉफ्टवेअर प्रकल्पांवर काम करण्याची संधी तसेच इंटर्नशिप कार्यक्रम उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

कंपनीचे संचालक सारंग वाकोडीकर आणि सहसंचालक पांडुरंग धुमाळ यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी पुण्यात विस्तार करण्यात आला आहे. तरीही 'सेटट्राईब'चे मुख्य कार्यालय किनवटमध्येच राहणार असून, आयटी क्षेत्रातील ज्ञानयज्ञ तेथे अखंड सुरू ठेवण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande