जगन्नाथ कांबळे यांच्या कवितांनी रसिक मंत्रमुग्ध
बीड, 01 एप्रिल, (हिं.स.)। गेवराई येथे महाराष्ट्र शासन ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालयाच्यावतीने ग्रंथोत्सव उपक्रमात कवी संमेलन पार पडले. यावेळी साहित्यिक जगन्नाथ कांबळे यांचा सत्कार झाला. महाराष्ट्र शासन, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथाल
जगन्नाथ कांबळे यांच्या कवितांनी रसिक मंत्रमुग्ध


बीड, 01 एप्रिल, (हिं.स.)। गेवराई येथे महाराष्ट्र शासन ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालयाच्यावतीने ग्रंथोत्सव उपक्रमात कवी संमेलन पार पडले. यावेळी साहित्यिक जगन्नाथ कांबळे यांचा सत्कार झाला.

महाराष्ट्र शासन, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने गेवराई येथील व. र. भ. अट्टल महाविद्यालयात आयोजित 'ग्रंथोत्सव २०२५' मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवात आयोजित कविसंमेलनाने रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला असून, विशेषतः कवी डॉ. जगन्नाथ एस. कांबळे यांच्या हृदयस्पर्शी कवितांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन सुधीर गव्हाणे यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थान अमरसिंह पंडित यांनी भूषवले. या सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, माजी मंत्री पंकजा मुंडे, खासदार बजरंग सोनवणे, राज्यसभा सदस्या रजनी पाटील, आमदार संदीप क्षीरसागर, नमिता मुंदडा, प्रकाश सोळुंके, धनंजय मुंडे, सतीश चव्हाण, विक्रम काळे, विजयसिंह पंडित व जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रंथोत्सव यशस्वी करण्यासाठी जिल्हा ग्रंथालयाधिकारी संजय मस्के, डॉ. राजेंद्र सानप, प्रा. भास्कर बडे, बाळासाहेब कांबळे व त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले. दोन दिवस चाललेल्या या व्याख्यान, परिसंवाद आणि कथाकथन सोहळ्यामुळे गेवराईचे वातावरण साहित्यमय झाले होते.

गेवराई शहरात ग्रंथोत्सव चा जागर, महोत्सवातील प्रमुख आकर्षण ठरलेल्या कविसंमेलनाचा प्रारंभ डॉ. जगन्नाथ एस. कांबळे यांच्या कवितांनी झाला. मानवी मनातील वेदना सतत हेलकावे घेत असतात, असे प्रतिपादन करत त्यांनी सादर केलेल्या रचनांनी उपस्थितांना अंतर्मुख केले. या संमेलनात दत्ता वाळेकर, माया दिवाण, प्रकाश भुते, सुरेखा येवले आणि प्रा. रेखा ढेरे यांनीही आपल्या दर्जेदार कविता सादर करून दाद मिळवली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande