
छत्रपती संभाजीनगर, 01 एप्रिल, (हिं.स.)। महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या., जिल्हा कार्यालय हिंगोली यांना सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षाकरिता थेट कर्ज योजनेअंतर्गत ३० लाभार्थी निवडीचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.
या योजनेअंतर्गत एकूण १११ अर्जदारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी केली असून त्यापैकी ७२ अर्ज पात्र तर ३९ अर्ज अपात्र ठरले आहेत. पात्र अर्जदारांमधून लाभार्थी निवड चिठ्ठीद्वारे (लॉटरी पद्धतीने) करण्यात येणार आहे.
यासाठी अपर जिल्हाधिकारी, हिंगोली तथा सदस्य सचिव, जिल्हा लाभार्थी निवड समिती यांच्या अध्यक्षतेखाली बैठक दि. ७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, रिसाला बाजार, हिंगोली येथे आयोजित करण्यात आली आहे. या लॉटरी प्रक्रियेदरम्यान संबंधित पात्र अर्जदारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis