वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर महालक्ष्मीदेवी मंदिरात भाविकांसाठी विविध सुविधा
कोल्हापूर, 01 एप्रिल (हिं.स.) - उन्हाची तीव्रता प्रचंड वाढत असून भाविकांना याची तीव्रता कमी व्हावी, यासाठी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मुख्य दर्शन रांगेत कायमस्वरूपी पत्राशेड उभारण्यात आली
पाणी सोय शेड


कोल्हापूर, 01 एप्रिल (हिं.स.) - उन्हाची तीव्रता प्रचंड वाढत असून भाविकांना याची तीव्रता कमी व्हावी, यासाठी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मुख्य दर्शन रांगेत कायमस्वरूपी पत्राशेड उभारण्यात आली असून रांगांमध्ये जारमधून भाविकांना ‘थंड’ पिण्याचे पाणी दिले जात आहे. भाविकांना थंड हवा मिळण्यासाठी मोठे ‘कुलर’ बसवण्यात आले आहेत. मंदिरात आत असलेल्या दर्शन रांगेतही ऊन, पाऊस यांपासून रक्षण करण्यासाठी दर्शन रांगेच्या वर पत्र्याची शेड उभी करण्यात आली आहे. दर्शन रांगेत भाविकांना पिण्याचे थंड पाणी मिळत असल्याने या संदर्भात भाविकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

* मंदिर परिसरात उन्हाचे चटके कमी करण्यासाठी पांढरा कोट !

मंदिराच्या परिसरात असलेली फरशी मोठ्या प्रमाणात तापून भाविकांचे पाय भाजतात. तरी भाविकांचे हे उन्हाचे चटके कमी करण्यासाठी देवस्थान समितीने मंदिर परिसरात पांढर्‍या रंगाचे विशेष ‘कूल कोट’चे पट्टे मारले आहेत. या पट्टयावरून चालल्यास पायाला चटके बसत नाहीत. यंदा हे दोन मोठे पट्टे मारण्यात आले असून भविष्यात आणखी पट्टे मारण्यात येणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande