रायगड- झूम्मापट्टी घाटात बस बंद, अपघात टळला
रायगड, 01 एप्रिल (हिं.स.)कर्जतहून सकाळी ८.१५ वाजता सुटणारी मिनी बस १ एप्रिल रोजी झूम्मापट्टी घाटात अचानक बंद पडली. सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास गाडीचा गिअर न पडल्याने बस थांबली आणि घाटातील तीव्र चढणीवर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
Mini bus gives April Fool's prank to passengers; Bus stopped at Jhummapatti Ghat, accident averted

रायगड, 01 एप्रिल (हिं.स.)कर्जतहून सकाळी ८.१५ वाजता सुटणारी मिनी बस १ एप्रिल रोजी झूम्मापट्टी घाटात अचानक बंद पडली. सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास गाडीचा गिअर न पडल्याने बस थांबली आणि घाटातील तीव्र चढणीवर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य अपघात टळला. मात्र, या घटनेमुळे मिनी बसच्या जीर्ण अवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.“माथेरानकरांना तात्काळ दोन नवीन मिनी बसेस मिळणार,” हे आश्वासन मागील तीन वर्षांपासून दिले जात असले तरी प्रत्यक्षात काहीच हालचाल होत नसल्याने स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या घटनेबाबत नितीन सावंत यांनी सांगितले की, “घाटाच्या सुरुवातीलाच बस बंद पडणे ही गंभीर बाब आहे. प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असून तातडीने नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात.” दरम्यान, वारंवार बिघाड होणाऱ्या मिनी बसमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार सुरूच असल्याची भावना व्यक्त होत असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)

 rajesh pande