खा.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते नांदेड पालिकेच्या विविध विकासकामांचा शुभारंभ
नांदेड, 01 एप्रिल, (हिं.स.)। खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते नांदेड पालिकेच्या विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. कौठा येथे २४×७ पाणी पुरवठा तर स्वच्छता ताफ्यात नवीन वाहने दाखल झाले आणि ७४ ऑनलाईन सेवांचा प्रारंभ झाला. नांदेड शहराच्या सर
Q


नांदेड, 01 एप्रिल, (हिं.स.)। खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते नांदेड पालिकेच्या विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.

कौठा येथे २४×७ पाणी पुरवठा तर स्वच्छता ताफ्यात नवीन वाहने दाखल झाले आणि ७४ ऑनलाईन सेवांचा प्रारंभ झाला.

नांदेड शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आणि नागरिकांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आज नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला. महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टी-शिवसेना महायुतीची सत्ता आल्यानंतर महपौरांनी १०० दिवसांचा कृती आराखडा प्रसिध्द केला होता. त्या आराखड्याची पहिली वचनपुर्ती आली. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण यांच्या शुभहस्ते या विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. नांदेडला स्मार्ट सिटीच्या दिशेने नेण्यासाठी पाणी, स्वच्छता आणि डिजिटल सेवा या त्रिसूत्रीवर आम्ही भर देत आहोत, असे मत खासदार अशोकराव चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande