मुंबई-मडगाव साप्ताहिक विशेष गाडीच्या सुधारित तारखा जाहीर
मुंबई, 01 एप्रिल (हिं.स.) - मध्य रेल्वेने ट्रेन क्रमांक 01019/01020 मुंबई-मडगाव साप्ताहिक विशेष गाडीच्या चालविण्यात येणाच्या तारखांमध्ये सुधारणा केली आहे. या गाड्या आता पूर्वीच्या दिनांक ०५.०४.२०२६ या तारखेऐवजी दिनांक १२.०४.२०२६ पासून चालविण्यात ये
एक्स्प्रेस


मुंबई, 01 एप्रिल (हिं.स.) - मध्य रेल्वेने ट्रेन क्रमांक 01019/01020 मुंबई-मडगाव साप्ताहिक विशेष गाडीच्या चालविण्यात येणाच्या तारखांमध्ये सुधारणा केली आहे. या गाड्या आता पूर्वीच्या दिनांक ०५.०४.२०२६ या तारखेऐवजी दिनांक १२.०४.२०२६ पासून चालविण्यात येतील.

सुधारित तपशील खालीलप्रमाणे आहेत:

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- मडगाव - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक विशेष (१८ सेवा)

ट्रेन क्रमांक 01019 ही साप्ताहिक विशेष दिनांक १२.०४.२०२६ ते ०७.०६.२०२६ या कालावधीत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दर रविवारी ००.५५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी १५.१५ वाजता पोहोचेल. (९ सेवा)

ट्रेन क्रमांक 01020 साप्ताहिक विशेष ही दिनांक १२.०४.२०२६ ते ०७.०६.२०२६ या कालावधीत, मडगाव येथून दर रविवारी १६.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०३.५० वाजता पोहोचेल. (९ सेवा)

थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिवि आणि करमळी.

संरचना: १ वातानुकूलित द्वितीय, ६ वातानुकूलित तृतीय, ९ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ सामान्य द्वितीय श्रेणी-सह-गार्ड ब्रेक व्हॅन.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande