
पुणे, 01 एप्रिल (हिं.स.)।
पुणे महापालिकेच्या मिळकतकर आणि बांधकाम विभागाने यंदा पाच हजार ३२६ कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे. यात मिळकतकराचा वाटा दोन हजार ९८५ कोटी, तर बांधकाम विभागाचा वाटा दोन हजार ३४१ कोटी रुपये आहे. मागील वर्षाच्या तुलनेत मिळकतकरात ६०० कोटींची वाढ झाली आहे.
मिळकतकर विभागाने तीन हजार २५० कोटींचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, ते पूर्ण होऊ शकले नाही. अभय योजनेमुळे विभागाला ९५४ कोटी ७८ लाख रुपये मिळाले. त्यामुळे उद्दिष्टाच्या जवळ पोहोचता आले. सुट्ट्यांच्या काळातही ग्राहक सुविधा केंद्रे सुरू ठेवल्याने आणि ऑनलाइन सुविधेमुळे कर संकलनास मदत झाली. दुसरीकडे, बांधकाम विभागाने दोन हजार ८५३ कोटींच्या उद्दिष्टाच्या तुलनेत दोन हजार ३४१ कोटी ८४ लाख रुपये मिळवले. जमीन मोजणीच्या तांत्रिक अडचणींमुळे या विभागाच्या महसुलावर परिणाम झाला. मात्र, एकट्या मार्च महिन्यात विभागाने ५८८ कोटी ८२ लाखांची कमाई केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु