एसएमबीटीला ‘ग्रेट प्लेस टू वर्क’चा आंतरराष्ट्रीय सन्मान
नाशिक, 01 एप्रिल (हिं.स.) :‘ग्रेट प्लेस टू वर्क’ या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून एसएमबीटीला ‘काम करण्यासाठी उत्तम ठिकाण’ म्हणून अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालये आणि आरोग्य संस्थांच्या श्रेणीत असा सन्मान मिळ
SMBT nominated as a ‘World


नाशिक, 01 एप्रिल (हिं.स.) :‘ग्रेट प्लेस टू वर्क’ या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून एसएमबीटीला ‘काम करण्यासाठी उत्तम ठिकाण’ म्हणून अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालये आणि आरोग्य संस्थांच्या श्रेणीत असा सन्मान मिळवणारी एसएमबीटी ही राज्यातील पहिली संस्था ठरली आहे.

‘ग्रेट प्लेस टू वर्क’ संस्था जगभरातील कंपन्या, शैक्षणिक व आरोग्य संस्थांच्या कार्यसंस्कृतीचे मूल्यांकन करते. कर्मचारी समाधान, कामाच्या ठिकाणी सन्मान आणि व्यवस्थापनाबद्दल विश्वास या घटकांवर आधारित सर्वेक्षणाद्वारे ही निवड केली जाते. एसएमबीटीने ही संपूर्ण प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली.

या प्रक्रियेत ‘ग्रेट प्लेस टू वर्क ट्रस्ट इंडेक्स सर्वेक्षण’ आणि ‘कल्चर ऑडिट’ या दोन महत्त्वाच्या टप्प्यांचा समावेश होता. संस्थेतील डॉक्टर, प्राध्यापक, परिचारिका आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे मार्च २०२६ ते मार्च २०२७ या कालावधीसाठी हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

या यशामध्ये सेंट्रल एचआर विभागप्रमुख सिताराम दिघे, एल ऍण्ड डी विभागप्रमुख मधुरता भावसार तसेच मच्छिंद्र वाळूंज, किरण पाटील, सोनाली पाटील, बाळासाहेब काळे, मनीषा देशमुख, अश्विनी भगत, देवेंद्र चव्हाण आणि उमेश पवार यांचे मोलाचे योगदान राहिले. उपक्रमाचे समन्वय कॉलेज ऑफ फार्मसीचे मनुष्यबळ विभागप्रमुख दिपक हांडगे यांनी साधले.

आत्मविश्वासाने ध्येयाकडे वाटचाल

“कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिल्यास केवळ संस्था नव्हे, तर कार्यसंस्कृतीही उंचावते. सातत्यपूर्ण कामगिरी, वाढ आणि योग्य कौतुक या त्रिसूत्रीवर आमचा विश्वास आहे. या यशामुळे अधिक आत्मविश्वासाने आणि दृढनिश्चयाने पुढे जाण्याची ऊर्जा मिळाली,” असे चीफ पिपल ऑफिसर डॉ. महेश गाभणे यांनी सांगितले.

सहकाऱ्यांच्या विश्वासाची पावती

“संस्थेच्या ध्येयावर विश्वास ठेवणाऱ्या घटकांमुळेच संस्था घडते. एसएमबीटीला मिळालेला ९७ टक्के ट्रस्ट स्कोअर हा सहकाऱ्यांच्या विश्वासाचा पुरावा आहे. हे यश संपूर्ण एसएमबीटी परिवाराच्या कष्ट आणि निष्ठेचे फलित आहे,” असे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. हर्षल तांबे यांनी नमूद केले.

------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande